शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By

Vastu tips दिवाळीत लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी वास्तुनुसार दारावर लावा तोरण

Vastu tips for Toran on main door during Diwali सनातन धर्मात भगवान गणेश आणि देवी महालक्ष्मीच्या आनंदाचा सण म्हणजे आश्विन अमावास्येला ला साजारा होणार सण दिवाळी. भगवान श्री विष्णूंच्या प्रिय असणाऱ्या महालक्ष्मीच्या स्वागतासाठीची तयारी बऱ्याच दिवसा पूर्वी सुरू होते. घर आणि व्यावसायिक संस्थान, कार्यालयाची स्वच्छता, रंग-रंगोटी केली जाते. त्या नंतर आपल्या घराला सजविण्याचे काम सुरू होते. दिवाळीवर देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी विविध प्रकाराचे तोरण मुख्य दारावर लावले जातात. जर आपण वास्तुच्या काही नियमांना लक्षात ठेवून रंग आणि दिशेनुसार तोरण बांधले, तर ते आपल्याला शुभ आणि चांगली फळ देतात आणि आनंद, यश आणि समृद्धी आपल्या जीवनात दार ठोठावते.
 
* तोरणाने आनंद येईल -  
मुख्य दारावर बांधल्या जाणाऱ्या तोरणाला बंधनवार असे ही म्हणतात. देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी आणि देवी आईला प्रसन्न करण्यासाठी दारावर हे बांधणे शुभ मानतात. हे बांधल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. तोरण आपण ताज्या फुलांचे, प्लॅस्टिकच्या फुलांचे किंवा धातूचे देखील बनवू शकता. आजकाल बाजारपेठेत वेगवेगळ्या रंगाचे आणि डिझाइनचे तोरण मिळतात. तोरणांची निवड घराच्या दिशेनुसार, रंग आणि आकार लक्षात घेऊन लावल्याने नशीब वाढतं. 
 
* पूर्वीकडे घराचे मुख्य दार असल्यास - 
जर आपल्या घराचे दार पूर्वमुखी असल्यास तर हिरव्या रंगाचे फुलांचे आणि पानाचे तोरण लावणं सुख आणि समृद्धीला आमंत्रण देत. या दिशेत ताज्या आंब्याच्या आणि अशोकाच्या पानाचे तोरण लावल्यानं सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि लक्ष्मीची कृपा मिळते.
 
* उत्तरेकडे घराचे मुख्य दार असल्यास -
धनाची दिशा उत्तरेच्या मुख्य दारासाठी निळे किंवा आकाशी रंगांच्या फुलांचे तोरण लावावे. जर आपल्याकडे ताजे फुले नसल्यास आपण प्लस्टिकच्या फुलांचा वापर करू शकता. पण लक्षात ठेवा की फुले आणि पाने तुटलेले किंवा घाणेरडे नसावे. हे नेहमीच नकारात्मकता वाढवतात.
 
* दक्षिणेकडे घराचे मुख्य दार असल्यास - 
जर घराचे मुख्य प्रवेश दार दक्षिणेकडे असल्यास तर लाल, नारंगी किंवा याचा सम रंगाने असलेले तोरण बांधावे. असे केल्याने घरात धनागमन होत आणि मान सन्मानात वाढ होते.
 
* पश्चिमेकडे घराचे मुख्य दार असल्यास -
घराचे मुख्य दार पश्चिमेकडे असल्यास मुख्य दारासाठी पिवळे, सोनेरी किंवा फिकट निळ्या रंगाच्या फुलांचे तोरण दारावर लावणं लाभ आणि प्रगतीस मदत करतं. लक्षात ठेवा की पूर्वी आणि दक्षिणे कडे असणाऱ्या दारावर कोणत्याही धातूचे तोरण लावू नये. पश्चिम आणि उत्तरे कडील दारावर धातूंचे तोरण लावू शकतो. अशा प्रकारे उत्तर, पूर्व आणि दक्षिण दिशेत बनलेल्या प्रवेश दारावर लाकडाचे तोरण लावू शकतो, पण पश्चिम दिशेला लाकडाचे तोरण लावणे टाळावे.