अनावश्यक वस्तू का ठेवता घरात?
| घराच्या एका कोपर्यात पडलेल्या वस्तू प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या जीवनप्रवाहाशी निगडीत असतात. त्यामुळे आपल्या प्रगतीत अडथळा निर्माण होऊ शकतो. |
|
|
अडगळ नाही असे घर शोधून देखील सापडणार नाही. अनेक लोकांना घरात खूपशा अनावश्यक वस्तू सांभाळून ठेवण्याची सवय असते. वास्तविक पाहत्या त्या वस्तुंचा ते उपयोगच कधीच करत नाही व त्या वस्तू फेकूनही देत नाही. त्या वस्तू घरात ठेवल्याने प्रगतीला खीळ बसते. फेंगशुईमध्ये अशा काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिले आहे. मानवी स्वभावाची काही उदाहरणे पुढील प्रमाणे-1)
घरात एका कोपर्यात पडलेला जुन्या कपड्यांचा संग्रह असू शकतो. या कपड्यांची फॅशन पुन्हा कधी तरी परतून येईल, या आशेने काही नागरिकांनी ते घरात मुद्दाम ठेवलेले असतात. किंवा ते कुणाच्या तरी आठवणीसाठी ठेवलेले असतात. मात्र, त्या कपड्याची फारशी काळजी घेतली जात नाही. भारी किंमतीचेही ते असू शकतात. मात्र सिंथेटिक असल्याने आपण त्यांना फारशी पसंती देत नाही. पण या कपड्यांनी मनात घर केले असल्याने ते फेकतही नाही.2)
जुनी मासिके, वर्तमानपत्रे, वर्तमानपत्रातील कात्रणे जुनी पुस्तके आदी वस्तू भविष्यात उपयोगी पडतील या आशेने आपण सांभाळून ठेवलेल्या असतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्याकडे आपले लक्ष गेलेले नसते.3)
तुटलेल्या शोभेच्या वस्तू.4)
जुन्या जमान्यातील ऑडिओ कॅसेटस् आणि व्हिडिओ कॅसेटस्. 5)
बर्याच दिवसांपासून नादुरूस्त झालेली उपकरणे.6)
बंद पडलेल्या मनगटी किंवा भिंतीवरच्या घड्याळे.7)
भंगार सामान त्यात लोखंडी किंवा प्लास्टीकचा.8)
जुन्या हिशोबाच्या वह्या आपण प्रगती करू इच्छित असाल तर या अनावश्यक वस्तू आधी घरातूनच काय तर तुमच्या जीवनातून हद्दपार केल्या पाहिजेत. गेल्या अनेक वर्षांपासून घरात भंगत असलेल्या या अनावश्यक वस्तूंमळे प्रगतीत व्यत्यय येत असतो. घराच्या एका कोपर्यात पडलेल्या वस्तू प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या जीवनप्रवाहाशी निगडीत असतात. त्यामुळे आपल्या प्रगतीत अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपल्या संग्रहातील प्रत्येक वस्तू आपल्या मेंदूमध्ये जागा व्यापत असते. आपल्या मेंदूंतील जागा ही विशिष्ट गोष्टींसाठी असते. त्यामुळे ती बिनकामाच्या वस्तुंनी घ्यायला नको. यासाठी घरातील अनावश्यक वस्तूंची विल्हेवाट लावली पाहिजे. हे करून झाल्यानंतर घरात दररोज अगरबत्ती लावावी. शिवाय देवाजवळ पूजाअर्चा करावी व घरात काही काळ घंटा वाजवावी.