असे असावे घराचे प्रवेशद्वार
प्रवेशद्वार हे घराचे मुख असते. म्हणूनच ते नेहमीच सजविण्यावर यजमानांचा भर असतो. फेंगशुईनुसार प्रवेशद्वार सजविणे हे संपन्नतेसाठी रस्ता मोकळा करण्यासारखे आहे. पण त्याचवेळी फेंगशुईनुसार सजावट करायची असल्यास काही गोष्टी माहित असणे जरूरीचे आहे. तुमचा फ्लॅट वरच्या मजल्यावर तळावर असेल आणि प्रवेशद्वारासमोर लिफ्ट किंवा वर जिना असेल तर पा-कूआ आरशाचा वापर करावा.दक्षिण-पश्चिम दिशा - दक्षिण-पश्चिम दिशेला असणारा दरवाजा पृथ्वी तत्त्वाशी संबंधित असतो. या क्षेत्रात सिरॅमिक किंवा मातीची किंवा लाल रंगाची कोणतीही वस्तू ठेवू शकता.पश्चिम दिशा - दाराचे तोंड पश्चिमेकडे असेल तर त्याचा संबंध धातू तत्त्वा आणि स्तनाशी असतो. ही दिशा मुलांच्या खोलीच्या दारासाठी उत्तम असते. यासाठी धातूने बनलेली विंड चाइम, क्रिस्टल किंवा सिरॅमिकचा वापर करावा.उत्तर दिशा -उत्तराभिमुखी दार जल तत्त्व आणि व्यक्तीच्या व्यवसायाशी संबंधित असते. प्रगतीच्या वाटेवर असणार्या व्यक्तींनी या दाराचा वापर वारंवार केला पाहिजे. या दाराजवळ धातूची विंड चाइम लटकवूनसुद्धा याला सक्रिय करू शकता. घरात फिश एक्वेरियम किंवा दाराच्या आत छोटासा कारंजाही बसवू शकता.उत्तर- पूर्व दरवाजा -पृथ्वी तत्त्वाशी संबंधित दाराचे तोंड उत्तर-पूर्वेकडे असते आणि ते ज्ञान व अध्ययनाचे प्रतीक आहे. या दिशेला मुलांचा शयनकक्ष व अभ्यासाची खोली असावी. या दाराला चमचमता प्रकाश किंवा लाल रंगांच्या वस्तूने सक्रिय करू शकता. पूर्व दिशा - पूर्वमुखी दार कुटुंब आणि घनिष्ठ मित्रांशी संबंधित असतो. या दाराची स्थिती सर्वोत्तम असते. पाणी लाकडाचे पोषण करते. म्हणून एक्वेरियम, कारंजा, किंवा झुलणारे रोप या भागात लावू शकता. दक्षिण-पूर्व-दिशा - दक्षिण-पूर्वेकडील दारांचा जास्त प्रयोग करणार्या व्यक्तीला आर्थिक फायदा खूप होतो. या दाराच्या बाजूला कुंडीत असलेली रोपे, ताजे फूल आणि एक्वेरियम असल्यास दाराचा प्रभाव वाढतो.घराच्या प्रत्येक दाराचा उपयोग केला पाहिजे, कारण उपयोगात न येणारे दार दुर्भाग्यशाली असतात. घराचे एखादे दार बंद असले तरी रोज किमान एकदा, दोनदा तरी त्याला उघडून बंद करा. त्यामुळे दार आणि त्याच्याशी संबंधित शक्ती सक्रीय रहातील.