1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट

1920 : रहस्यमय घराची कहाणी

1920 रहस्यमय घराची कहाणी
IFMIFM
निर्माता - सुरेंद्र शर्मा, भागवती गबरानी, अमिता बिष्नोई
दिग्दर्शक - विक्रम भट
गीत - समीर
संगीत - अदनान सामी
कलाकार - रजनीश दुग्गल, अदा शर्मा, राज जुत्शी, विपीन शर्मा, वल्लभ व्यास, आशिष प्रधान

सन 1920 मधील ही कथा आहे. एका खूप मोठ्या घरात काही सदस्यांना दफन करण्यात आले होते. एक शापित घर म्हणून या घराकडे पाहिले जात असते. हे खर खरेदी करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, त्यांचा रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला. या घरात कोणतीच व्यक्ती राहू शकत नाही.

IFMIFM
अर्जुन (रजनीश दुग्गल) आणि त्याची पत्नी लीसा (अदा शर्मा) या घरात येतात. हे घर पाडून याठिकाणी हॉटेल बांधण्याचा
त्यांचा विचार असतो. अचानक त्यांनाही चित्रविचित्र घटनांना सामोरे जावे लागते. या घटनांमुळे अर्जुन आणि लीसा एकांवरच संशय व्यक्त करू लागतात. लीसा आपल्या धर्मगुरुंवर तर अर्जुन आपल्या एका डॉक्टर मित्रावर विश्वास ठेवतात. पण, ते देखील त्यांची समस्या सोडवू शकत नाहीत. जिवंत असल्यासारखे ते घर दोघांना गुपचुप बघत राहते. आता अर्जुन आणि लीसाला केवळ एकमेकांवरील प्रेमच वाचवू शकते आणि तेच या दोघांना वाचवते. पण, ते कसे? ते चित्रपट पाहिल्यावरच समजेल.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा