1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

एक : रहस्यमय हाताळणी

एक : द पावर ऑफ वन
निर्माता : के सेरा सेरा, धरम फिल्मस
दिग्दर्शक : संगीत सिवन
कलाकार : बॉबी देवल, श्रेया सरन, नाना पाटेकर, चंकी पांडे

बॉबी देवलचे चित्रपट ति‍कीट खिडकीवर एकामागून एक कोसळत असले तरी निर्माते व दिग्दर्शक त्याच्यावर अगदी खूश असल्याचे दिसते. आगामी दोन महिन्यात बॉबीचे तब्बल चार ते पाच चित्रपट झळकणार आहेत. या साखळीतीलच दिग्दर्शक संगीत सिवन यांचा चित्रपट 'एक : द पावर ऑफ वन' प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपट रहस्यमय आहे. उत्कंठावर्धक पटकथा, वेगवान हाताळणी व संवादाची उत्तम पेरणी अनुभवायला मिळणार आहे.

चित्रपटाचा नायक नंदूवर (बॉबी देवल) एका राजकीय नेत्याच्या खूनाचा आरोप असून पोलिसांचा ससेमिरा चुकवत तो भटकत असतो. पोलिस मागे लागलेले असतांना तो रेल्वेगाडीत चढतो. येथे त्याची भेट शेखर नावाच्या व्यक्तीशी होते. शेखर तब्बल चौदा वर्षानंतर नातेवाईकाच्या लग्नासाठी घरी जाणार असतो. नंदू व शेखरची मैत्री जमते व गप्पांच्चा मैफलीत कौटुंबिक माहितीची देवाणघेवाण होते. इतक्यात पोलिस येतात.

नंदू पळायला लागतो. पोलिस गोळी झाडतात पण गोळी लागून शेखर मारला जातो व कथानक अनपेक्षित वळण घेते. आपल्यामूळे शेखर बळी पडल्याने नंदू दु:खी होतो व त्याचे साहित्य घेऊन त्याच्या घरी जातो. शेखरचे कुटूंबीय नंदूस शेखर समजून त्याच्यावर प्रेम व वात्सल्याचा वर्षाव करतात. नंदू सांगायचे असूनही शेखरविषयी काहीच सांगू शकत नाही.

गावातील मुलगी प्रीत (श्रेया सरन) नंदूस शेखर समजून प्रेम करायला लागते. दरम्यान, नंदूला पकडण्याची जबाबदारी सीबीआयचे इन्स्पेक्टर राणे (नाना पाटेकर) यांच्यावर सोपविण्यात येते. राणे कार्यक्षम अधिकारी म्हणून खात्यात प्रसिद्ध आहे. राणे नंदूस पकडतो काय? नेत्याचा खरा खूनी कोण? नंदू आपण निरपराध असल्याचे सिद्ध करू शकतो काय? या प्रश्नांच्या उत्तरासाठी 'एक : द पावर ऑफ वन' बघावा लागेल.