1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट

''ओ, माय गॉड...'' कॉमेडी चस्का

IFM
निर्माता - ी. लाइमलाइट
दिग्दर्शक - सौरभ श्रीवास्तव
कलाकार - विनय पाठक, दिव्या दत्ता, सौरभ शुक्ला, हर्ष छाया, गौरव गेरा

माणूस अडचणीत आला की, त्याला देव आठवतो. देव आपली मदत करतो पण, त्याला आपण ओळखू शकत नाही, याच धर्तीवर चित्रपटाची कथा बेतली आहे.

IFM
राजेंद्र (विनय पाठक) हा सामान्य माणूस आहे. सेल्समन असला तरी त्याची स्वप्ने मात्र मोठी आहेत. ही स्वप्ने पुर्ण करण्यासाठी कठोर परीश्रम करण्याची त्याची तयारी आहे. तो धीरूभाई अंबानींना आपला आदर्श मानतो.

सुमन (दिव्या दत्ता) ही त्याची पत्नी असून त्यांचा सुखाचा संसार सुरू असतो. ती आपल्या परीने राजेंद्रला साथ देत असते आणि तिच्यासाठी राजेंद्रच हिरो आहे.

त्यांच्या लग्नाला पाच वर्षे होऊनही त्याला मुल नको असते. सुमनचा देवावर विश्वास असल्याने राजेंद्र एक दिवस नक्कीच यशस्वी होईल असा तिला विश्वास असतो. राजेंद्रही आपले काम इमानदारीने करत असतो.

IFM
चित्रपटात देवही दाखविण्यात आला आहे. ही भूमिका सौरभ शुक्ला यांना साकारली आहे. आपण मानतो तसे हे देवराज नसून चॉकलेट, चिप्स आणि पिज्जा खाणारे आहेत. सूट परीधान करणारे हे देवराज कधीकधी निराशही होतात. सामान्य माणसाप्रमाणेच ते सुध्दा बोर होतात. ते राजेंद्रची मदत करण्याचा निर्णय घेतात. पण, त्यांनी दिलेल्या संधी राजेंद्र ओळखू शकत नाही.
एक सामान्य माणसाची कथा दिग्दर्शक सौरभ श्रीवास्तव यांनी विनोदी अंगाने सादर केले आहे. केवळ 19 दिवसांमध्ये शूटींग करण्यात आली आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा