''रफूचक्कर'' फन ऑन द रन
|
संगीत - ललित पंडित
कलाकार - असलम खान, नौहीद, युधिष्ठिर, निशा रावल, शक्ती कपूर, सदाशिव अमरापूरकर, अर्चना पूरणसिंह, मीता वशिष्ठ, अनंत महादेवन, टीनू आनंद
जीवनावर प्रेम करा आणि पुरेपूर मजा लुटा, असे सूत्र असणा-या चार पात्रांवर आधारीत 'रफूचक्कर' ची कथा बेतली आहे. पप्पू (असलम खान) आणि मुन्नू (युधिष्ठिर) नावाच्या भावांना पी. एम अशा टोपण नावाने ओळखले जाते. ते श्रीमंत घरातील आहेत.
|
वयाने जास्त असणा-या केके नामक बहिणींनाही पुरुषांचा तिटकारा असल्याने त्या अविवाहित असतात. त्यांनी वयाच्या 45 पर्यंत लग्न केले तरच घरची संपत्ती मिळेल, अन्यथा ही संपत्ती एका ट्रस्टला द्यावी, असे त्यांच्या वडिलांनी मृत्युपत्रात लिहून ठेवलेले असते. या ट्रस्टचे काम दिलखुश (सदाशिव अमरापूरकर) आणि हसमुख (शक्ती कपूर) हे पाहत असतात.
|
इकडे एम. जे बहिणीचेही पीएमवर प्रेम जडते. हे चौघेजण एकत्र येऊन केके बहिणींपासून मुकती मिळवण्यासाठी त्यांचा खून करण्याचा निर्णय घेतात आणि येथूनच चित्रपट मजेशीर वळण घेतो. केके बहिणींचा खून होतो? पी. एम व एम. जे एकत्र येतात? के. के बहिणींना संपत्ती मिळते? हे जाणून घेण्यासाठी पाहा 'रफूचक्कर'
