अज्ञात- थेट पार्ट २ पहा !
बॅनर : यूटीवी मोशन पिक्चर्स
निर्माता : रामगोपाल वर्मा, रॉनी स्क्रूवाला
दिग्दर्शक : रामगोपाल वर्मा
संगीत : इमरान, बपी, टुटुल
कलाकार : नितिन रेड्डी, प्रियंका कोठारी, गौतम रोडे, इशरत अली
* यू/ए * 12 रील
रेटिंग : 0/5
तुम्ही आईसक्रिम खायला गेलात. पैसे दिलेत. तुम्हाला रिकामा कोन दिला जातो. मग तुम्ही आईसक्रिम भरून घेण्यासाठी जाता. पण तुम्हाला आईसक्रिम दिलंच जात नाही. वारंवार विचारल्यानंतर उत्तर मिळतं, आता पुढच्या मोसमात या. तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्हाला येत असतील तितक्या शिव्या तुम्ही नक्की आठवाल नाही का? रामगोपाल वर्माचा 'अज्ञात' पाहिल्यानंतरही हीच भावना मनात येते.
रामूने अर्धाकच्चा चित्रपट प्रदर्शित केल्यासारखा वाटतो आहे. आणि वर निगरगट्टपणे यातले रहस्य तुम्हाला अज्ञात- २ मध्ये पहायला मिळेल असे लिहिले आहे. मग चित्रपट पाहिल्यानंतर फसविल्याची भावना मनात येऊन आणि रामूला शिव्यांची लाखोली वहात प्रेक्षक बाहेर येणार नाही तर काय?
अज्ञातची कथा यापूर्वी अनेकदा येऊन गेलीय. एका जंगलात चित्रपटाचे शुटींग सुरू आहे. पण कॅमेरा खराब झालाय. नवा कॅमेरा येईपर्यंत काय करणार म्हणून लोक जंगल बघण्यासाठी आत शिरतात. त्यातल्या सेतू नावाच्या व्यक्तीलाच आतला रस्ता माहिती आहे. आत गेल्यानंतर अचानक कसला तरी आवाज येतो. तो कसला आवाज आहे हे सेतूला कळते. पण तो मारला जातो. मग एकामागोमाग एक मरतात किंवा स्वत-ला मारून घेतात. नायक आणि नायिका तेवढे वाचतात. शेवटी जंगलातून ते बाहेर निघतात. पण मारणारा कोण? याची उत्सुकता आपल्याला असते. तेवढ्यात पडद्यावर येते, यातले रहस्य आपणास 'अज्ञात-२' मध्ये पहायला मिळेल.
असा संताप होतो ही पाटी पाहिल्यावर. रामूच्या फॅक्टरीतून एकामागोमाग एक चित्रपट निघत असतात. अज्ञातसाठी त्याच्या हातात कच्ची कथा होती. त्याने सांगितले असेल चित्रपट सुरू करा. चित्रपट सुरू झाला असेल. पण नंतर शेवट सुचत नसल्याने त्याने सांगितले असेल इथे थांबवा तिथे चित्रपट थांबवून पुढच्या भागाची पाटी टाकण्यात आली असावी असे वाटते. सीक्वलची कल्पना क्लायमॅक्स न सुचल्यामुळे आल्याचीच शक्यता जास्त वाटते. कदाचित हा रामूचा प्रयोगही असावा. पण असले प्रयोग चालत नाहीत आणि प्रयोगाच्या नावाखाली काहीही करून चालत नाही हे आता त्याने लक्षात घ्यावे.
बाकी या चित्रपटात रामूतला दिग्दर्शक कुठेही दिसला नाही. थ्रिलर चित्रपटात थ्रिल मात्र दिसत नाही. असल्या विषयावरच्या मालिकांचा रतीब टिव्हीवर पडत असताना या चित्रपटात नवीन काहीही वाटत नाही. रामूचा टच हरवल्यासारखा वाटतोय. मुळातच स्टोरीत दम नसल्याने आणि दाखविण्यासारखे काहीही नसल्याने प्रियंका कोठारीचे शरीर तेवढे कॅमेरा शक्य तेवढ्या वेळा दाखवतो.
प्रियंका कोठारीव्यतिरिक्त बरीच नटमंडळी अपरिचित आहे. तेलगूतला स्टार नितिन रेड्डी नायक आहे. त्याने बरे काम केलेय. प्रियंकाकडून अंगप्रदर्शनाव्यतिरिक्त काय अपेक्षा करणार? रवी काळे व इतर मंडळी ठीक. जंगलाची दृश्ये छान आहेत. अमर-मोहिलेचे पार्श्वसंगीत चागंले आहे. गाणी जबरदस्तीने घुसडली आहेत.
एकुणात रामूने लोकांना 'येडं' बनवायचा प्लॅन आखला होता. तो त्याच्यावरच उलटण्याची शक्यता जास्त आहे.