''कर्ज'' - भरपूर मसाला
|
दिग्दर्शक - सतीश कौशिक
संगीत - हिमेश रेशमिया
कलाकार - हिमेश रेशमिया, श्वेता कुमार, उर्मिला मातोंडकर, डैनी, डीनो मोरिया, गुलशन ग्रोवर, रोहिणी हट्टंगडी,
बख्तियार इराणी, राज बब्बर, असरानी
चित्रपटाचा रीमेक बनविण्यात सतीश कौशिक यांचा हात कोणीच धरू शकत नाही. त्यांनी दक्षिण भारतातील भाषांतील चित्रपट हिंदीत रीमेक केले. यावेळी त्यांनी सुभाष घई यांचा 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कर्ज' च्या धर्तीवर हिमेश रेशमियाला घेऊन ‘कर्ज’ची निर्मिती केली आहे.
|
सुट्टीच्या दिवसात तो केरळला जातो. तेथे त्याला स्वप्नात दिसणारा बंगला दिसतो. त्या बंगल्याबद्दल तो माहिती घेतो. तो बंगला रवी वर्मा (डीनो मोरिया) चा असतो. रवीचा एका अपघातात मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतर आई व बहीण कोठे गेल्या याची कोणालाच माहिती नसते. आता मॉटीच्या डोळ्यासमोर साफ चित्र उभे राहते आणि त्याला सर्व काही लक्षात येते.
रवी वर्मा दुसरा कोणी नाही तर तो स्वतः असतो. त्याने कामिनी (उर्मिला मातोंडकर) नामक युवतीशी प्रेमविवाह केला होता, हे देखील त्याच्या लक्षात येते. कामिनी जिवंत असल्याने तिचा शोध घेण्याचे तो ठरवतो. ती टिनाचे पालन-पोषण कामिनी करत असते.
|
|
या चित्रपटाची मोठी कमजोरी म्हणजे अभिनेता हिमेश रेशमिया हा आहे. त्याला अभिनयाचा गंधही नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सतीश कौशिक यांनी चतुराईने त्याच्यातील कमीपणा लपविण्याचा प्रयत्न केला आहे.
श्वेता कुमार या नव्या नायिकेचाही चित्रपटात काहीच प्रभाव पडत नाही. उर्मिला मातोंडकरने खलनायिकेच्या भूमिकेत ख-या अर्थाने चित्रपट 'खाल्ला' आहे. गुलशन ग्रोवर आणि राज बब्बरची भूमिका महत्त्वाची आहे. डॅनी आणि असरानीने प्रेक्षकांना हसविण्याचा प्रयत्न केला आहे. डीनो मोरिया आणि रोहिणी हट्टंगडी यांना कमीच संधी मिळाली.
| |
|
.
