जोधा अकबरची संथ सुरुवात
(बॉक्स ऑफिस 8 ते 14 फेब्रुवारी 2008)
|
हा चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक गर्दी करतील असे वाटले होते. मात्र असे काहीही झाले नाही. काही ठिकाणी 'जोधा अकबर'ला बर्यापैकी तर काही ठिकाणी हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. चित्रपटाची लांबी आणि ऐतिहासिक चित्रपट हे यामागचे कारण असू शकते.
सध्या प्रेक्षक मसाला चित्रपट आणि विनोदी चित्रपटांनाच पसंतीची पावती देतात. मोठ्या शहरांमध्ये सुरुवातीला या चित्रपटाने 60 ते 80 टक्के व्यवसाय केला तर छोट्या शहरांमध्ये 30 ते 40 टक्के व्यवसाय केला. शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस असल्याने यात थोडी भर पडली इतकेच.
मल्टिप्लेक्स मालक आणि चित्रपट निर्मात्यामध्ये असलेल्या वादामुळे काही मल्टिप्लेक्सेसमध्ये हा चित्रपट प्रदर्शितच झाला नाही. त्यामुळे निर्मात्याला फार मोठे नुकसान सहन करावे लागले. शनिवारी आणि रविवारी मात्र काही चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला. रजपूत समाजाच्या भावना दुखावल्या या नावाखाली काही शहरांमध्ये चित्रपटाला विरोध होत आहे. काही शहरांमध्ये तर चित्रपट प्रदर्शितच होऊ शकला नाही.
8 फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या 'मिथ्या' चा व्यवसाय काही शहरे सोडली तर प्रत्येक ठिकाणी निराशाजनकच झाला. 116 चित्रपट गृहांमधील मिळालेल्या आकड्यांनुसार जवळपास दोन करोड रुपये इतका व्यवसाय या चित्रपटाने केला.
कुणाल खेमूचे 'सुपरस्टार' बनण्याचे स्वप्न देखील या आठवड्यात धुळीस मिळाले. त्याचा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. 169 चित्रपटगृहातील मिळालेल्या आकड्यांनुसार या चित्रपटाने जवळपास सव्वा कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
|
1) मिथ्या (पहिला आठवडा)
2) संडे (तिसरा आठवडा)
3) सुपरस्टार (पहिला आठवडा)
4) तारे जमी पर (आठवा आठवडा)
5) वेलकम (आठवा आठवडा)
