तुम (ना) मिलो तो सही
PR
PRदिग्दर्शक : कबीर सदानंद
संगीत : संदेश शांडिल्य
कलाकार : डिंपल कपाडिया, नाना पाटेकर, सुनील शेट्टी, विद्या माळवदे, अंजना सुखानी, रेहान खान, मोहनीश बहल
यू सर्टिफिकेट * 2 तास 14 मिनिट
रेटिंग : 2/5
'तुम मिलो तो सही' ही तीन जोडप्यांची कहाणी आहे. वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावर असलेल्या या जोडप्यांची प्रेमाची व्याख्याही वेगळी आहे. या तिन्ही कथांना जोडणारा सांधाही आहे.
नाना (सुब्रमण्यम) आणि डिंपल (दिलशाद) हे फिफ्टी प्लस जोडपे आहे. ऑफिसमधून सुब्रमण्यमला 'आऊटडेटेड' म्हणून काढून टाकले आहे. त्यामुळे नव्या पिढीवर तो चिडलेला आहे. चित्रपटातली ही कथा मस्त रंगली आहे. त्यात नाना व डिंपलच्या अभिनयाचे रंगही पहायला मिळतात.
PR
PRतिरी कथा रेहान व अंजना यांच्या प्रेमाची आहे. विशीतले हे जोडपे. त्यातल्या रेहानचे अंजनावर आणि तिचे मात्र भलत्यावर प्रेम आहे. पण तिला त्याच्या प्रेमाची जाणीव फार उशिरा होते.
PR
PRलेखक कबीर सदानंदपेक्षा त्यांच्यातला दिग्दर्शक प्रभावी वाटतो. अभिनयाच्या बाबतीत नाना-डिंपल वगळता 'बोंब' आहे. संपादन चांगले नाही. संगीतही नीरस आहे.
