1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. चित्रपट समीक्षा
  4. द शौकिन : चित्रपट परीक्षण

द शौकिन : चित्रपट परीक्षण

the shaukin
बॅनर : केप ऑफ गुड फिल्म्स
निर्माता : मुराद खेतानी, अश्विन वर्दे
दिर्ग्दशक   : अभिषेक शर्मा
संगीत : यो यो हनी सिंह, हर्द कौर, विक्रम नागी, आर्को मुखर्जी, डीजे नॉटोरियस
कलाकार : अक्षय कुमार, लिसा हेडन, अनुपम खेर, पियूष मिश्रा, अन्नू कपूर, पाहुणा कलाकार- अभिषेक बच्चन, करीना कपूर खान, डिम्पल कपाड़िया, सुनील शेट्टी

हे वर्ष अक्षयकुमारसाठी शानदार ठरले. त्याने यावर्षी ‘हॉलिडे’ आणि ‘एंटरटेन्मेंट’ सारखे दोन यशस्वी सिनेमे दिले आहेत. ‘द शौकिन’मधून त्याला यशाची पुन्हा एक हॅट्ट्रिक लावायची आहे. ‘द शौकिन’ 1982 मध्ये आलेल्या शौकिनचा रिमेक आहे. परंतु या सिनेमामध्ये खूप काही नावीन्य आहे. लाली (अनुपम खेर), केडी (अन्नू कपूर) आणि पिंकी (पियूष मिश्र) हे तिघे मित्र आहेत. वयाने तिघेही वयस्कर आहेत. परंतु त्यांचे मन एखाद्या लहान निरागस मुलासारखे आहे. बाजार, गार्डन प्रत्येक ठिकाणी तिघे आपल्यापेक्षा कमी वयाच्या तरुणींचे निरीक्षण करतात. तरुणींना जेव्हा या तिघांच्या कृत्याची जाणीव होते, तेव्हा तिघे विचार करतात, की दिल्ली सोडून मॉरिशसला जायचे. 
 
मॉरिशसमध्ये तिघे अहाना (लीसा हेडन)च्या येथे भाडय़ाच्या घरात राहतात. अहाना खूप मनमोकळी असते. तिचे सुपरस्टार अक्षयकुमारला भेटण्याचे स्वप्न असते. अहाना लाली, केडी आणि पिंकीला तिच्या स्वप्नाविषयी सांगते. ती त्यांना म्हणते, कुणी जर तिची भेट अक्षयकुमारशी घालून दिली तर ती त्याच्यासाठी काहीही करू शकते. येथूनच सिनेमा नवीन वळण घेतो. सिनेमात कॉमेडीचा तडका आणखी वाढत जातो. सिनेमात पुढे काय होते, हे पाहण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये गेल्याशिवाय कळणार नाही. कारण कॉमेडी तुम्हाला पडद्यावरच दिसेल. अक्षयकुमार आणि लीसा हेडनसोबत इंडस्ट्रीचे तीन दिग्गज कलाकार सिनेमात आहेत. अनुपम खेर, अन्नू कपूर आणि पियूष मिश्र यांनी पुन्हा एकदा सिध्द केले, की ते वयानेच नव्हे तर अभिनयानेसुध्दा दिग्गज आहेत.