दुर्देवाचे ''दशावतार''
|
दिग्दर्शक : के.एस. रविकुमार
गीत : समीर
संगीत : हिमेश रेशमिया
कलाकार : कमल हासन, असिन, मल्लिका शेरावत, जया प्रदा
* डब * यू सर्टिफिकेट
रेटिंग : 2/5
कमल हसनला वेगवेगळ्या भूमिकांचा सोस असला तरी त्यात त्याच्या अभिनयापेक्षा त्याच्या नव्या अवताराचेचे अप्रुप तेवढे उरते आणि कमलचा अभिनय मात्र त्यावर 'कलम' होतो. त्यामुळेच कमल अभिनेता वाटण्यापेक्षा बहुरूपी जास्त वाटतो. 'दशावतार' हाही बहुरूपी कमल हसनचे विविध 'अवतार' दाखविणारा चित्रपट आहे. यात हिरो, व्हिलन आणि सगळ्या सहाय्यक भूमिका म्हणजे सबकुछ कमल हसन आहे.
बारावे शतक ते २१ वे शतक असा याच्या कथेचा परीघ आहे. शिव आणि विष्णू समर्थकांची लढाई हा त्याचा विषय २१ व्या शतकापर्यंत खेचून आणला आहे. त्याला काहीही तार्किक आधार नाही. २१ व्या शतकात २००४ मध्ये अमेरिकेत लाखो लोकांचे प्राण घेऊ शकेल असा व्हायरस तयार करण्यात येतो. अनेक देश हा व्हायरस मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. पण गोविंद नावाच्या एका भारतीय शास्त्रज्ञाला हे कळते, तेव्हा तो हा व्हायरस घेऊन भारतात पळ काढतो. त्याच्या मागोमाग खलनायकही येतो. मग 'टॉम अँड जेरी' चा खेळ सुरू होतो.
|
चित्रपटावर प्रचंड पैसा खर्च करण्यात आला आहे. एक्शन दृश्ये छान आहेत. हिमेश रेशमियाच्या संगीतात दम नाही. एकुणात काय हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांच्या दुर्देवाचे 'दशावतार' आहेत.
