1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. चित्रपट समीक्षा
Written By
Last Modified: सोमवार, 13 जुलै 2015 (11:08 IST)

बाहुबली : चित्रपट परीक्षण

bahubali
प्रभास आणि राणा डग्गुबती या अभिनेत्यांनी त्यांच्या भूमिका उत्कृष्ट वठवल्या आहेत. उंचीपासून ते अभिनयापर्यंत सर्वच गोष्टीत हे दोघे अगदी फिट बसले आहेत. 
 
तमन्ना भाटिया आणि अनुष्का शेट्टी यांनीही त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. बाहुबली या सिनेमाची कहाणी सुरु होते माहेष्मती या काल्पनिक नगरापासून. येथील महाराणीची दोन मुले आहेत. अमरेंद्र बाहुबली (प्रभास) आणि भालाल देव (राणा डग्गुबती). 
 
महाराणी दोघांपैकी एकाला माहेष्मतीचे सिंहासन देऊ इच्छिते. जसजशी सिनेमाची कहाणी पुढे सरकते, तसतसा अनेक गोष्टींवरुन पडदा उचलला जातो. कथेत अवंतिका (तमन्ना भाटिया) आणि देवसेना (अनुष्का शेट्टी) या अभिनेत्रींच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. माहेष्मतीचे सिंहासन कुणाला मिळतं? शिवुडला भलालच्या लोकांशी का युद्ध करावे लागते? अशा प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा सिनेमा बघायला हवा. राजामौली यांनी या सिनेमाच्या कथेवर तब्बल आठ वर्षे काम केले आहे. यामध्ये त्यांची मेहनत स्पष्ट दिसते. सिनेमातील प्रत्येक दृश्य उत्कृष्टरीत्या साकारण्यात आले आहे. या सिनेमात प्रेक्षकांना नक्कीच वेगळेपण बघायला मिळतं. राजामौली दक्षिण फिल्म इंडस्ट्रीत अनेक वर्षापासून कार्यरत असून भारतातील उत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी ते एक आहेत.