Ganapati Mandir of India and out of India | परदेशातील गणेश मंदिरे
पुढे पहा विविध देशातील गणेश मंदिरांची संक्षिप्त माहिती...
विविध देशातील गणेश मंदिरांची संक्षिप्त माहिती
|
|
|
|
जपान - जपानमध्ये कांगीतेन, शोदेन आणि विनायक या नावाने गणेशाचा उल्लेख केला जातो. 'कांगीतेन' म्हणजे भाग्याची देवता आणि 'शोदेन' म्हणजे प्रथम देव! हिजोकीत सामान्यत: 'विनायक' शब्दाचा उपयोग केला जातो. जपानी गृह तंत्र धातु योगात वज्रधातु मंडळाचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. या मंडलाच्या रचनेत गणपतीची पाच रूप चित्रित केली आहेत. जपानमध्ये प्रदक्षिणा इशान्य अर्थात पूर्वोत्तर कोनात सुरू केली जाते. 1) पूर्वेला- कोंगो-जाई-तेन (छत्र-विनायक) चे छत्र श्वेत रंगाचे आहे. 2) दक्षिणेला- कोंगो-जिकी-तेन (माल्य-विनायक) यांच्या गळ्यात पुष्पमाळा आहे. 3) पश्चिमेला- कोंगो-एतेनच्या (धनुर्विनायक) हातात धनुष्यबाण आहे. 4) उत्तरेला- जोबुकुतेनच्या (खडग विनायक) हातात खडग असून त्याचा वर्ण लाल रंगाचा आहे. 5) पाचवे कांगीतेनच्या (भाग्य-देवता) एका हातात लाडू आणि दुसर्या हातात मुळी आहे.
|
|
|
|
कंबोडिया - येथील अंकुर वटाला अंगोरवार या नावाने ओळखले जाते. हे स्थापत्य कला क्षेत्र जगप्रसिद्ध आहे. येथे सुद्धा गणपतीची स्थापना केली जाते. येथील गणपतीचे रूप आणि आकार वेगळा आहे. कंबोडियात गणपतीची कांस्यमूर्ती मिळते.
थायलंड - येथे गणपतीच्या अनेक आकर्षक आणि कलात्मक मूर्ती आहेत.
|
|
|
|
मलया - धातू आणि दगडाने तयार केलेल्या गणेशाच्या प्रतिमा सापडतात. या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे गणेशाची सोंड खाली एकदम सरळ जाऊन डोक्याकडे वळते.
जावा - येथील चंडी-बनोन नावाच्या शिवमंदिरात गणपतीची मूर्ती आहे. नदीकिनारी असलेल्या घाटावर गणपतीच्या अनेक मूर्ती दिसून येतात. जावामध्ये गणपतीच्या स्वतंत्र मंदिराशिवाय शिवाच्या मंदिरातच त्याची पूजा केली जाते. येथील अनेक मूर्ती आपल्याला ब्रिटीश संग्रहालयात दिसून येतात.
म्यानमार - येथे गणपतीला 'महापिएन' या नावाने ओळखले जाते. गणपती येथील लोकांचे आराध्य दैवत आहे. गणपतीच्या विविध आकार आणि प्रकारच्या अनेक मूर्ती आहेत.
|
|
|
|
