देशात मोदींची नाही भाजपची लहर- जोशी
गुजरात मॉडेल देशभर चालणार नाही. तसेच देशात नरेंद्र मोदींची नाही तर भाजपची लहर असल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी केला आहे.
नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहे. मात्र 'अबकी बार मोदी सरकार'चा गजर सगळीकडे सुरु असल्याचे दिसत आहे.
नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातल्या वाराणसीमधून निवडणूक लढवत आहे. मुरली मनोहर जोशी हे वाराणसीचे विद्यमान खासदार आहे. विशेष म्हणजे मुरली मनोहर जोशी यांनी नरेंद्र मोदींसाठी वाराणसीचा मतदार संघ सोडून कानपूरमधून निवडणूक लढवावी लागत आहे. त्यामुळे मुरली मनोहर जोशी नाराज झाले आहे. नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.