1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
  6. नाशकात मनसेचा नमो नमोचा जप!

नाशकात मनसेचा नमो नमोचा जप!

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा फोटो छापून महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केलेल्या पत्रकबाजीवर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. भाजपच्या पदाधिकार्‍यांनी तत्काळ आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी कान टोचल्यानंतरही मनसेने नमो नमोचा जप सुरुच ठेवला आहे. गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रदीप पवार यांच्या प्रचारासाठी गुजराती भाषेत प्रचार पत्रक प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यावर नरेंद्र मोदी यांचा फोटो छापण्यात आल्याने शिवसेनेच्या गोटात संतापाचे वातावरण आहे.

शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या पारंपरिक गुजराती मतदाराना आकर्षित करण्यासाठी मनसेनं डाव रचला असून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप शिवसेना करतेय.
About Writer
WD