1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: मुंबई , मंगळवार, 29 एप्रिल 2014 (10:54 IST)

मनसे आणि आप संपणार- छगन भुजबळ

LoksabhaElection News
देशभरात 16 लोकसभा निवडणुकीसाठी मतदानप्रक्रिया सुरु असून राज्यातील तीन टप्प्यात मतदान झाले. यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आम आदमी पक्ष संपणार हे निश्चित असल्याचे भाकीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षांची डोकदुखी राहणार नसल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

विधानसभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप या चार पक्षांमध्येच निवडणुका लढवल्या जातील, असे मत सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. नाशिक लोकसभा मतदारसंघातून आपला विजय निश्चित असल्याचेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

मनसेचे नाशिकमध्ये 3 आमदार, 43 नगसेवक आणि महापौर आहे. मनसेची मोठी ताकद असताना काँग्रेस आघाडीचे अवघे दोन आमदार आहेत. नाशिकमध्ये मनसेच्या तुलेनत राष्ट्रवादीची ताकद कमी असताना या वेळी वेगळे चित्र पाहायला मिळाले. राज ठाकरे यांना लोकांनी तितकेचे स्वीकारलेले दिसले नाही. मनसेचा उमदेवार चालावा, जेणेकरून मतविभाजनाचा फायदा होईल, अशी आपल्याला अपेक्षा होती. मात्र, तसे काहीच न झाल्यामुळे आपली लढत थेट शिवसेनेच्या हेमंत गोडसेंशी झाली, असे भुजबळ म्हणाले.