1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
  6. शरद पवारांचा संयम ढळतोय- गडकरी

शरद पवारांचा संयम ढळतोय- गडकरी

नागपूर- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. पवारांना पराभव समोर दिसत असल्याने त्यांचा संयम ढळतोय, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी केली आहे.
 
जालन्यात प्रचारसभेत शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली होती. मोदी काँग्रेसमुक्त देशाची घोषणा करत आहेत मात्र त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, अशा शब्दात पवारांनी मोदींवर शरसंधान साधले होते.
 
पवारांच्या टीकेला उत्तर देताना नितीन गडकरींनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर भाजप आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगला आहे.