धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दीपके यांच्या आईची मुलाच्या विजयावर भावनिक प्रतिक्रिया
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, काकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या आईने एक भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे देशात राजकीय खळबळ उडाली आहे. या मोठ्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर, काकरोच जनता पक्षाचे संस्थापक आणि प्रमुख कार्यकर्ते अभिजीत दीपके यांच्या आई अनिता दीपके यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथून, त्यांनी आपल्या मुलाचा खडतर संघर्ष सांगितला.
तसेच अभिजीत दीपके यांची आई भावूक होऊन म्हणल्या "आज माझा मुलगा जिंकला, आज देशातील मुले स्वतंत्र झाली आहे." हे शब्द आहे एका आईचे, जिच्या मुलाने गेल्या कित्येक आठवड्यांपासून विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढण्याकरिता आपली झोप आणि आरोग्य पणाला लावले आहे.
अभिजीतची आई, अनिता दीपके, भावूक झाल्या आणि म्हणाल्या, "आज माझ्या मुलाच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे आणि त्याने यश मिळवले आहे. एक आई म्हणून, हा क्षण मला अभिमान आणि समाधान दोन्ही देतो." आपल्या मुलाच्या संघर्षाची आठवण सांगताना, अभिजीतच्या आईने सांगितले की, जयपूरमधील आंदोलनादरम्यान जेव्हा अभिजीतवर शाई फेकण्यात आली, तेव्हा संपूर्ण कुटुंब घाबरले होते. त्या म्हणाल्या, "त्यावेळी आम्हाला त्याच्या सुरक्षेची खूप भीती वाटत होती. राजकारण आणि आंदोलनाचे वातावरण इतके तापले होते की काहीतरी अनुचित घडण्याची शक्यता दाटून आली होती. पण अभिजीतने कधीही हार मानली नाही आणि तो आपल्या निश्चयावर ठाम राहिला."#WATCH | Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra | Parents of Cockroach Janta Party's Founding President Abhijeet Dipke get emotional after Union Minister Dharmendra Pradhan resigns. pic.twitter.com/LkxTiKmLf6
— ANI (@ANI) July 25, 2026
तसेच अभिजीत दीपकेच्या आईने स्पष्ट केले की, जंतर मंतरवरील सततच्या आंदोलनादरम्यान अभिजीतची प्रकृती खूपच खालावली होती. त्याला खूप ताप होता." त्याची अवस्था पाहून, एक आई म्हणून मी त्याला सर्व काम सोडून ताबडतोब घरी परत येण्याची विनंती केली. पण त्याने स्पष्टपणे नकार दिला. अभिजीतचा हा दृढनिश्चय आणि जंतर मंतरवरील कार्यकर्त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच अखेरीस हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा अभिजीतचे समर्थक आणि त्याचे कुटुंबीय एक मोठा नैतिक आणि राजकीय विजय मानत आहे. देशभरातील तरुण आणि कार्यकर्ते या बातमीने भारावून गेले आहे.
Edited By- Dhanashri Naik

