क्रिस्पी मसाला केक
|
कृती : कढईत तेल गरम करून त्यात कांदे चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात गाजर, मटरचे दाणे, मीठ व तिखट टाकावे. भाज्या भिजतील तेवढेच पाणी टाकावे, भाज्या गळल्यानंतर त्या काढून घ्याव्या. मैदा व बेकिंग पावडर चाळून घ्यावे. अंडी फेटून त्यात मिसळावे. त्यात तयार भाजी व दूध घालून चांगले कालवावे. एका भांड्यात तूप लावून त्यात हे मिश्रण घालावे व ओव्हनमध्ये 20-25 मिनिट बेक करून घ्यावे. हा केक लहान मुलांना फारच आवडतो, टोमॅटो सूप किंवा चहा सोबत सर्व्ह करावे.
