1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. हिंदू धर्माविषयी

आनंद आत्म्याचा सहज धर्म आहे

आनंद आत्म्याचा सहज धर्म आहे
व्यर्थ भटकणे :-

आनंद मिळविण्या करता दृष्यांत म्हणजे ऐहिक दुनियेत भटकणार्‍याला आनंदाऐवजी दु:खच प्राप्त होते. निर्मळ आनंद प्राप्त करण्याकरता अंत:करणात डोकविण्याची आवश्यकता आहे. इंद्रिये अंतर्मुख झाली की निर्मळ आनंद मिळतो. बहिर्मुख झाली तर सुखदु:खाच्या भोवऱ्यात अडकतात. ह्याचा अर्थ बाह्य साधनात आनंद असता तर अपचन झालेल्याला रूचकर जेवणांची घृणा का यावी? मन जेव्हा अंतर्मुख होते तेव्हा ते चैतन्याला स्पर्श करू शकते.

जेव्हा चैतन्यप्रभूला स्पर्श होतो तेव्हाच अनिर्वचनीय आनंद प्राप्त होतो. आत्म्याच्या स्वरूपात स्थिर राहणार्‍यालाच शाश्वत शांती आणि आनंदाचा अनुभव येतो. आनंद आत्म्याचा सहज धर्म आहे. तर सुख दु:ख मनाचे स्वाभाविक धर्म आहेत. म्हणून आनंद प्राप्त करण्यासाठी आजपासूनच बाह्य साधनाच्या मागे भटकणे सोडून द्या.

(श्रीमदभागवत या महान ग्रंथाचे सार सांगणाऱ्या परमपूज्य डोंगरे महाराजकृत भागवत प्रसादी या पुस्तकाचा भावानुवाद)
अनुवादकः सौ. कमल जोशी
About Writer
सौ. कमल जोशी