1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
  4. गोदेच्याकाठी हरितकुंभास प्रारंभ

गोदेच्याकाठी हरितकुंभास प्रारंभ

नाशिक कुंभमेळा 2015
गोदा नदीच्या तिरावर धर्मध्वजारोहणाने  आज सिंहस्थ कुंभपर्वास आरंभ झाला असून सकाळी गुरू आणि रवी यांचा सिंह राशीत प्रवेश झाल्यानंतर नाशिकला वैष्णवांचा, तर त्र्यंबकेश्वरला शैव पंथियांचा मेळा भरला आहे.
 
नाशिकला रामकुंडावर, त्र्यंबकेश्वरला कुशावर्तावर पुरोहित संघातर्फे धर्मध्वजारोहण झाले. यावेळी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, १३ महिन्यांच्या या कालावधीसाठी नाशिकमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे.

कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा ठेवण्यात आला आहे.