1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 13 जानेवारी 2015 (12:17 IST)

प्रेम : श्री श्री रविशंकर

shri shri ravishankar
ही काही प्रेमाची चिन्हे आहेत. 
 
जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता तेव्हा तुम्हाला त्याच्यात काही चुका दिसत नाहीत. जरी तुम्हाला त्यांच्या काही दोष दिसला तरी तुम्ही त्या दोषाचे समर्थन करता आणि म्हणता, ‘मग, प्रत्येकजण तेच करतो, ते नेहमीचेच आहे.’ तुम्हाला असे वाटते की, तुम्ही त्यांच्यासाठी पुरेसे काही केलेले नाही. तुम्ही जेवढे कराल तेवढे तुम्हाला त्यांच्यासाठी अधिकाधिक करावेसे वाटते. ते सतत तुमच्या मनात असतात. 
 
सर्वसामान्य गोष्टी असामान्य होतात. उदा. एखाद्या छोटय़ा मुलाने त्याच्या आजीला डोळा मारणे, ही एक असामान्य गोष्ट होते. जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता तेव्हा त्यांनी सतत आनंदी असावे असे तुम्हाला वाटते आणि त्यांना सर्व उत्तम तेच मिळावे असे वाटते. 
 
श्री श्री रविशंकर 
 
(‘मौन एक उत्सव’ मधून साभार)