चॉकलेटी मोबाईल करंजी
साहित्य : मैदा 250 ग्रॅम, तूप 1 चमचा, 1/4 चमचा बेकिंग पावडर, चिमूटभर मीठ व कोको पावडर, तळण्यासाठी तूप व दूध.
सारणासाठी साहित्य : 100-100 ग्रॅम मावा व पिठी साखर, काजू-बदामचे काप, मनुका, वेलची पूड, चॉकलेट सॉस व 1 चॉकलेट किसलेले.
सारणासाठी साहित्य : 100-100 ग्रॅम मावा व पिठी साखर, काजू-बदामचे काप, मनुका, वेलची पूड, चॉकलेट सॉस व 1 चॉकलेट किसलेले.
ND |
कृती : सर्वप्रथम करंजीसाठी लागणारे सर्व साहित्य एकजीव करून घ्यावे, तूप व दूध सोडून. दूध घालून मैदा चांगला मळून घ्यावा. चॉकलेट सॉसला सोडून बाकी सर्व सारणाचे साहित्य मिक्स करावे. मैद्याचे लहान लहान पुऱ्या लाटाव्या व मधोमध चॉकलेट मिक्स ठेवून चारी बाजूने पाण्याच्या हात लावून त्या बंद कराव्या. तूप गरम करून त्यात सर्व करंज्या कमी आचेवर सोनेरी होईपर्यंत तळून घ्याव्या. थोडे गार झाल्यावर कोनामध्ये चॉकलेट सॉस भरून मोबाईल सारखे नंबर व डिझाइन बनवावे. चॉकलेटी मोबाईल करंजी दिसण्यात सुंदर व खाण्याच रुचकर लागते.
