1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड

''कवि''ला ऑस्करची हुलकावणी

झोपडपट्टीत रहाणार्‍या एका गरीब भारतीय मुलाच्या धडपडीवर आधारीत 'कवि' नावाच्या एका लघुपटाला ऑस्कर काही मिळू शकला नाही. डेनमार्कच्या 'द न्यू टेनंटस' या चित्रपटाने या विभागात ऑस्कर पटकावले. कविचे दिग्दर्शन ग्रेग हेल्वे यांनी केले होते. १९ मिनिटाचा हा लघुपट भारताशी संबंधित असल्याने त्याविषयी कुतूहल होते.

हा चित्रपट भारताची गरीबी दर्शवितो, अशी टीकाही त्यावर करण्यात आली होती. गेल्या वर्षी स्लमडग मिलिनियर आणि स्माईल पिंकी या ऑस्कर प्राप्त चित्रपटांतही गरीबी हे सुत्र होते. त्या आधारे यंदा कविलाही हा पुरस्कार मिळेल असा होरा होता. मात्र, तो चुकीचा ठरला.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा