1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड

जेम्स बॉन्ड खलनायकाच्या भूमिकेत

जेम्स बॉन्ड खलनायकाच्या भूमिकेत
जेम्स बॉन्ड अभिनेता डेनियल क्रेग 'टिनटिन' वर बनविण्‍यात येत असलेल्या एका चित्रपटात खलनायकाच्या रूपात दिसून येणार आहे.

'मिरर डॉट को डॉट यूके' ने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाचे दिग्दर्शन स्टीवन स्पीलबर्ग करत आहेत. टिनटिन या युवा पत्रकाराची भूमिका अभिनेता जेमी बेल करणार आहे. रेड रॅकहेम या खलनायकाची भूमिका डेनियल रंगविणार आहे.

'द एडवेनचर्स ऑफ टिनटिन- सिक्रेट ऑफ द द यूनिकॉर्न' असे या चित्रपटाचे नाव असून डेनियल यांच्या भूमिकेमुळे शूटिंग सुरू होण्यापूर्वीच हा चित्रपट चर्चेत आला आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा