1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड

''मॅर्ली एंड मी''

मॅर्ली एंड मी
WD
'मॅर्ली एंड मी' हा चित्रपट यूएसमध्ये प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 14.75 मिलियन डॉलरचे रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले. 'ख्रिसमस-डे' दिवशी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये या चित्रपटाला सर्वाधिक कलेक्शन मिळाले.

इतकेच नव्हे तर या चित्रपटाने केवळ 11 दिवसांत 106.7 मिलियनचा व्यवसाय केला. आता हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. भारतात 6 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

रोमांस आणि कॉमेडीने भरपूर असा हा चित्रपट जॉन ग्रोगन यांच्या कादंबरीवर आधारीत आहे. डेविड फ्रेंकेल यांनी दिग्दर्शन केले आहे. डेविड यांनी 'द डेविल वियर्स प्राडा' सारखे चित्रपट केले आहेत. 'मॅर्ली एंड मी' मध्ये जेनिफर एनिस्टन, ओवेन विल्सन आणि एरिक डेन यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा