'दिल्लीवाली गर्लफ्रेंड'वर थिरकले मुशर्रफ
इस्लामाबाद- पाकिस्तानाचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यात मुशर्रफ हे एका नाईट क्लबमध्ये दिल्लीवाली गर्लफ्रेंड या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.
दोन दिवसांपूर्वी हा सोशल मीडियावर शेअर होऊ लागला आणि पाहता पाहता एवढा व्हायरल झाला की तो चर्चेचा विषय बनला. रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोन यांच्या ये जवानी है दिवानी या 2013 मधील चित्रपटातील दिल्लीवाली गर्लफ्रेंड हे गाजलेले गाणे पाकिस्तानाचे माजी लष्करशहा मुशर्रफ यांना भलतेच भावलेले दिसते. एका अज्ञात तरूणीसोबत नाईट क्लबमध्ये नाचताना ते व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
