1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. One dead during Shah Rukh Khan's Raees promotions in Vadodara

शाहरुखला पाहण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरी १ ठार

बडोद्यामध्ये रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रेल्वेनं प्रवास करणाऱ्या शाहरुख खानला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका स्थानिक नगरसेवकाचा जीव गेला आहे. फरीद खान असे त्याचे नाव आहे. आहे. फरीद खान हा समाजवादी पक्षाचा स्थानिक नेता आणि नगरसेवक होता. यावेळी दोन पोलीसही जखमी झाले आहेत.
अभिनेता शाहरुख खान मुंबईहून दिल्लीला  रईस च्या प्रमोशनसाठी चालला होता. रात्री 10.30 च्या सुमारास ही ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेस बडोदा स्थानकात दाखल झाली.  मुंबई ते दिल्ली प्रवास करणाऱ्या शाहरुख खानला पाहण्यासाठी वडोदरा स्टेशनवर प्रचंड गर्दी उसळली. चाहत्यांनी रेल्वे ट्रॅकसह प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी केली होती. रेल्वेच्या टपावर चढूनही चाहत्यांनी रेल्वे रोखून धरली होती. गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर धावपळ होवून चेंगराचेंगरी झाली. यात सदरचा प्रकार घडला.