1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

''आई'' जाड तर ''मुले'' जाड

स्थूल महिलांचे प्रमाण दिवसें दिवस वाढत असून याचा विपरित परिणाम त्यांच्या मुलांवरही होत असल्याचे अमेरिकेतील वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे.

स्थूल महिलांमुळे त्यांच्या मुलांमध्येही स्थूलता दिसून येते तसेच त्यांच्यात मांसपेशीही कमी असतात असे वैज्ञानिकांना एका परीक्षणात आढळून आले आहे.

अमेरिकेच्या ओक्लाहोमा विद्यापीठातील आरोग्य विज्ञान विभागाच्या डॉ के डी डेवीड यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच एक संशोधन करण्यात आले.

जर आई जाड असेल तर जन्माला येणारे बाळही जाड असते, परंतु त्याच्यात मासपेशी कमी असतात असे डेवीड यांनी स्पष्ट केले आहे.

या कारणाने त्यांना मुलांना बालवयातच मधुमेह किंवा हृदयरोग होण्याची शक्यता असल्याचेही या संशोधनात निदर्शनास आले आहे.