1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
  6. आकाशातून पडले, तरी पाण्यात तरले!

Toddler rescued after Yemeni jet crashes with 153 on board | आकाशातून पडले, तरी पाण्यात तरले!

देव तारी त्याला कोण मारी हा अनुभव आज हिंदी महासागरात कोसळलेल्या येमेनी विमानाच्या माध्यमातून आला. आज सकाळी कोसळलेल्या या विमानातील सर्वच्या सर्व म्हणजे १५३ प्रवाशांना जलसमाधी मिळाल्याची शक्यता वर्तवली जात असताना, यातील एक लहान बाळ तेवढे आश्चर्यकारकरित्या वाचले आहे. कॉमोरो बेटाच्या पोलिस अधिकार्‍यांनीही या वृत्तास पुष्टी दिली आहे.

हे विमान कोसळले तेथून या बाळाला जिवंत ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे, अशी माहिती कॉमोरोच्या पोलिस अधिकारी राचिंडा अब्दुल्ला यांनी दिली. आतापर्यंत तीन मृतदेह सापडले असून या बालकाखेरीज अजून कुणीही जिवंत सापडेले नाही, असेही अब्दुल्ला यांनी सांगितले.

येमेनचे हे विमान एअरबस ३१० १४२ प्रवाशांना घेऊन ग्रॅंड कोमोर बेटांवरील मोरोनी येथे उतरणार होते. विमानात प्रवाशांखेरीज ११ कर्मचारीही होते. यातले बहुतांश प्रवासी कोमोरोजचे होते आणि ते पॅरीसहून परतत होते. यातले साठ जण फ्रेंच नागरिक होते.

हे विमान आज सकाळी उतरण्याच्या प्रयत्नात असताना जोरदार वार्‍यांमुळे उतरू शकले नाही आणि समुद्रात कोसळले.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा