आता ''स्टेंजेल'' घसरले
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यासह परराष्ट्रमंत्री कोंडालीजा राईस यांनीही भारतीयांवर बेलगाम टीका केल्यानंतर, आता बुश यांच्या कार्यालयातील उप प्रवक्त्यानेही तेलाच्या वाढत्या किंमतींना भारतीयच जबाबदार असल्याचे वक्तव्य केल्याने भारतीय अर्थतज्ज्ञांनी अमेरिकेला आवरण्याचा इशारा दिला आहे.
भारतीय मध्यमवर्गियांच्या खाण्यापिण्यांच्या सवयीमुळेच जगात महागाई वाढल्याचे बुश यांनी व्यक्त केल्यानंतर, त्यांच्या वक्तव्याविषयी सारवा सारव करण्यासाठी व्हाईट हाउस तर्फे पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती.
यादरम्यान व्हाईटचे उपप्रवक्ते स्कॉट स्टेंजेल यांनीही वाढत्या तेलाच्या किंमतींबद्दल भारतीयांनाच दोषी ठरवले आहे.भारत आणि चीनमध्ये तेलाची मागणी वाढल्यानेच तेलाचे भाव वाढल्याचे ते म्हणाले.