खेळता-खेळता दातांची सफाई
आपले दात साफ करताना दातांची प्रतिमा कॉम्प्यूटरवर दिसली तर ब्रश दाताच्या कोणत्या कोपर्यात जात आहे आणि कोणता दात साफ होत आहे याची जाणीव मुलांना होवून दुर्गंधी साफ करण्यास मदत होवू शकते. त्यामुळे तोंडाचे आरोग्यदेखील चांगले राहील.
खेळात आरोग्यविषयक माहिती दिली आणि मुले खेळता-खेळता आरोग्याकडे लक्ष द्यायला लागले तर त्याचा किती फायदा होवू शकतो. नॅशनल तैवान विद्यापीठाने 'लर्निंग थ्रू प्ले' च्या माध्यमातून मुलांना तोंडाचे आरोग्य कसे चांगले ठेवता येईल हे शिकविले आहे. या प्रयोगासाठी त्यांनी कॉम्प्यूयराइज टूथब्रशचा वापर केला.
विद्यापीठातील हाओ हुआ चू यांनी आपल्या सहकार्यांसमवेत असा टूथब्रश तयार केला आहे की, जो मुलांना तोंडाच्या आरोग्याकडे एक खेळ म्हणून पाहण्यास प्रवृत्त करेल. संशोधकांनी सामान्य टूथब्रशच्या शेवटी तीन एलईडी जोडले आहेत. त्याला कॉम्प्यूटर व्हिजनच्या तंत्रज्ञानाने पाहिले जावू शकते.
बाथरूमच्या सिंकवर वेब कॅमेरा लावला तर तो 'प्लेफुल टूथब्रश' चा खेळ सहज पाहिला जावू शकतो. तो त्रिआयामी नजरेस पडेल आणि संबंधित माहिती कॉम्प्यूटरवर दाखविली जाईल.