गाझात अकरा दहशतवादी ठार
इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये गाझा पट्टीत पुन्हा संघर्ष उफाळला असून यात अकरा दहशतवादी मारले गेले आहेत.
या संघर्षात प्रतिस्पर्धी अतिरेकी संघटना हमास आणि फतह यांनी आपापल्या समर्थकांना आपल्या बाजूने लढण्याचे आवाहन केले आहे.
तीन आठवड्यापूर्वींच संघर्षाला पूर्णविराम मिळाला होता. मात्र, दहशतवादी संघटनांनी रॉकेटद्वारे हल्ला करण्याचे सत्र सुरू ठेवल्यानंतर इस्त्रायलने या भागात लढाऊ विमान व बुलडोझर तैनात केले. या संघटनांवर दबाव आणणे हा त्यामागील हेतू होता. मात्र, दहशतवादी संघटनांनी गाझा व इस्त्रायलदरम्यानच्या रस्त्यावर सुरूंग पेरून ठेवले आणि सैनिकांवर गोळीबार सुरू ठेवला.