- वृत्त-जगत
» - मराठी बातम्या
» - आंतरराष्ट्रीय
जर 'स्पेस वॉर' झाले तर?
अंतराळात जीवसृष्टी अस्तित्वात आहे का? या प्रश्नाचेच उत्तर अजून पर्यंत वैज्ञानिकांना मिळाले नसताना जर 'स्पेस वॉर' अर्थात अंतराळ युद्ध झाले तर पृथ्वीच नष्ट होण्याची भिती आता वैज्ञानिकांना सतावत आहे. लंडनमधील 'न्यू सायंटीस' या मासिकाने यासंबंधी वैज्ञानिकांनी नुकत्याच केलेल्या दोन संशोधनांचे वृत्त प्रकाशीत केले असून, जर पृथ्वीवासी आणि अंतराळातील एलियंन्समध्ये युद्ध झाले, तर पृथ्वीवर भयानक विनाश होईल अशी भिती या संशोधनात आढळून आली आहे.तसेच अंतराळात विविध देशांनी लवलेल्या सेटलाईला मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याने माहिती आणि तंत्रज्ञानाचे बारा वाजतील असा वैज्ञानिकांचा दावा आहे. यापूर्वी 2000 साली अमेरिकी कॉग्रेसने सरकारला इशारा दिला होता, की अमेरिकी सुरक्षा व्यवस्था सेटलाईटच्या आधारावर अवलंबून असणे चुकीचे आहे.