1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

झरदारी-गिलानी आमने-सामने

झरदारी गिलानी आमने सामने
पाकिस्‍तानला सर्वांत मोठा धोका भारताकडून नव्‍हे तर देशांतर्गत भागातील दहशतवाद्यांकडून असल्‍याच्या पाकिस्‍तानी राष्‍ट्राध्‍यक्ष आसीफ अली झरदारी यांच्‍या वक्तव्‍यास पाकी पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांनी चुकीचे ठरविले असून हा झरदारी यांचा वैयक्तीक विचार असू शकतो असे म्हटले आहे.

पाकिस्तानी माध्‍यमांनी दिलेल्‍या वृत्तानुसार गिलानी यांनी इजिप्‍तमध्‍ये शर्म-अल-शेखमध्‍ये तटस्‍थ राष्‍ट्रांच्‍या संमेलना दरम्‍यान भारतीय पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्‍या सोबतच्‍या बैठकीची माहिती पत्रकारांना दिली. गिलानी म्हणाले, की भारता संदर्भात झरदारी यांच्‍या वक्तव्‍यानंतरही भारतासोबत गेल्‍या 62 वर्षांपासून होत असलेल्‍या संघर्षाच्‍या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानला अधिक सतर्क राहण्‍याची गरज आहे.
About Writer
वार्ता