1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

.. तर मुशर्रफ यांना माफी

.. तर मुशर्रफ यांना माफी
तीन नोव्हेंबर रोजी पाकचे राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांनी देशातील न्यायाधीशांच्या बडतर्फीचा घेतलेला निर्णय दुर्भाग्यपूर्ण असल्याचे सांगत, त्यांच्या या निर्णया मागे जर राष्ट्रहीत हे कारण असेल तर त्यांना या प्रकरणात माफ करण्यात येऊ शकते असे मत पाकचे कायदा मंत्री फारूख नायक यांनी व्यक्त केले आहे.

फारूख यांच्या शब्दाला पाकिस्तान पीपल्स पार्टीत( पीपीपी) वजन आहे. पीपीपीच्या गिलानी सरकारने नुकतेच मुशर्रफ यांचे अधिकार कमी करण्‍यासाठी कायद्यात काही सुधारणा करण्याची तरतूद करण्याची तयारी सुरू केली आहे.

दरम्यान फारूख यांच्या विधानावरून आता नवीन वादाला तोंड फुटले असून, त्यांचे विधान म्हणजे पीपीपी सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट संकेत असल्याचे मुस्लिम लीगने म्हटले आहे.
About Writer
वार्ता