1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

दुबईत भारतीय शाळा....?

खाडी देशात भारतीयांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यांना भारतीय पद्धतीचे शिक्षण मिळत नसल्याने दुबईमध्ये केंद्रीय शाळा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

मनुष्यबळ विकास राज्यमंत्री ए. ए. फातमी यांनी ही माहिती दिली.कुवेत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत फातमी यांनी ही माहिती दिली आहे.

दोन दिवसांसाठी फातमी कुवेत दौर्‍यावर असून अशा स्वरूपाच्या भारतीय शाळा बनविण्यास परवानगी मिळाली तर, खाडी देशातील भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणाचे नवे दालन मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.