1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

पंतप्रधानपदावरून पीपीपीत मतभेद

पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार मानले जाणार्‍या मख्दुम फहीम यांच्या नावावरून पीपीपीत मतभेद निर्माण झाले आहेत. उपाध्यक्ष आसीफ अली झरदारी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या पीपीपीच्या बैठकीत हे मतभेद विकोपाला गेले असल्याचे वृत्त आहे.

संसदेत पीपीपीच्या नेतेपदी नेमकी कोणाची निवड करायची या विषयावर इस्लामाबादेत पक्षातर्फे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वीच नेते पदासाठी मख्दुम यांचे नाव चर्चेले जात होते. त्यांच्या नावावर एकमत होऊ न शकल्याने सध्या तरी ही निवड पुढे ढकलण्यातआल्याचे झरदारी यांनी स्पष्ट केले आहे.