1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

पाकची शासनपध्‍दती ''खिचडी'': गिलानी

पाकिस्‍तानची सध्‍याची शासन पध्‍दती म्हणजे खिचडी असून येथे संसदीय की राष्ट्रपती या पैकी कुठलीही पध्‍दत निश्चित नसल्‍याने नेहमीच गोंधळ डत असल्‍याचा त्रागा पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांनी व्‍यक्त केला आहे.

आंतरराष्ट्रीय इस्लामी विद्यापीठात आयोजित दीक्षांत समारंभात एका विद्यार्थ्‍याने विचारलेल्‍या प्रश्‍नावर ते बोलत होते. वर्ष 1973 च्‍या राज्य घटनेला नव्‍या संशोधनासह लागू करण्‍यासाठी आपण प्रयत्‍न करीत असल्‍याचे त्यांनी सांगितले.


आगामी काळात माध्‍यमांवरील सरकारी नियंत्रण काढून घेण्‍याचेही त्यांनी यावेळी सुतोवाच केले.