1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

''पुतिन'' यांना नोबेल पुरस्कार

'पुतिन' यांना नोबेल पुरस्कार
रशियाची बिघडलेली घडी पुन्हा व्यवस्थित बसवणार्‍या राष्ट्राध्यक्ष वाल्दमिर पुतिन यांना लुडविग नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

रशियातील लुडविग नोबेल पुरस्कार समितीतर्फे हा पुरस्कार दिला जातो. रशियासाठी पुतिन यांनी दिलेल्या योगदाना बद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती पुरस्कार समितीचे अध्यक्ष येवगेनी लुकोस्कोव यांनी दिली.

बोरिस येल्तसिन यांच्या काळात देशातील कायदा सुव्यवस्था मोडकळीस आली होती, यानंतर तर देशात नुसता कहर माजला होता.

देशाची आर्थिक परिस्थिती बिघडली होती. अशा वेळी पुतिन यांनी देशाची मोडलेली घडी पुन्हा सुरळीत केली. त्यांच्याच काळात रशियाचे गेलेले वैभव परत मिळाल्याने त्यांच्या या योगदानासाठी त्यांना नोबेल देण्यात येणार असल्याचेही लुकोस्कोव यांनी स्पष्ट केले.
About Writer
वार्ता