1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

बांगलादेशात उसळली दंगल

सीएनजी गॅसच्या दरात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर राजधानी ढाक्यासह संपूर्ण बांगलादेशात सरकार विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

ढाक्यात नागरिकांनी केलेल्या दगड फेक आणि जाळपोळी नंतर 50 जण जखमी झाले असून, या सर्वांना ढाक्यातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ढाका विद्यापीठातील विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षात काही पोलिसही जखमी झाल्याचे बोलले जात आहे.

बस कंडक्टरने वाढीव दर नुसार विद्यार्थ्यांकडे पैशाची मागणी केल्यानंतर दंगल उसळल्याचे पोलिसांनी सांगितले, सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.