1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By भाषा|
Last Modified: वॉशिंग्टन , गुरूवार, 27 मार्च 2008 (16:46 IST)

बुशना चिंता तिबेटची

बुशना चिंता तिबेटची
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांना तिबेट प्रकरणाची चिंता सतावत आहे. तिबेट प्रश्नी चीनने संयमाची भूमिका घ्यावी असा आग्रह त्यांनी यापूर्वीच चीनला केला आहे. आता या आपल्या वक्तव्याची आठवण करून देण्यासाठी त्यांनी पुन्हा चीनचे राष्ट्राध्यक्ष हू जिनताओ यांच्याशी फोनवरून बराच वेळ चर्चा केली आहे.


इतकेच नाही तर चीनने दलाई लामांशी चर्चा करावी असला सल्लाही त्यांनी चीन सरकारला दिला आहे. चीन सरकार तिबेट विषयी लामांशी चर्चा करण्यास उत्सुक आहे, पण लामांनी आधी तिबेटच्या स्वातंत्र्याची मागणी सोडून द्यावी अशी मागणी यावेळी जिनताओ यांनी केल्याचे समजते.