1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

लोकशाही सोबत तडजोड नाही

देशात नवीन घटना तयार करताना लोकशाहीशी कोणतीही तडजोड करण्यात येणार नसल्याचे नेपाळचे पंतप्रधान गिरिजा प्रसाद कोईराला यांनी स्पष्ट केले आहे.

नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये माओवाद्यांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यामुळे देशातील राजेशाहीचा अस्त होणार असल्याचे मानले जात आहे.

यासाठी नेपाळमध्ये घटना तयार करण्याचे काम सुरू होत असून, यात लोकशाहीलाच अधिक महत्त्व दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नेपाळ कॉग्रेसचे उपाध्यक्ष रामचंद्र पांड्याल यांनीही कोईराला यांच्या मताशी सहमती दर्शवली असून, व्यक्तीगत स्वातंत्र्यावर गदा येणार असेल तर लोकशाहीचा फायदाच काय असा प्रश्न उपस्थित केला आहे.