1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

समुद्रही बनतेय ''वाळवंट''

समुद्रही बनतेय 'वाळवंट'
ग्लोबल वॉर्मिंगचा जबरदस्त फटका सध्या जगाला बसत असून, यामुळे निसर्गाला मरणासन्न अवस्था प्राप्त झाली आहे. या पासून आता
समुद्रही सुटू शकले नसून, ग्लोबल वॉर्मींगमुळे समुद्र अक्षरशः:वाळवंटात परावर्तित होत असल्याची भिती अमेरिकी वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकी वैज्ञानिकांनी समुद्राचे बारकाईने निरीक्षण करणार्‍या सूक्ष्म यंत्राच्या साहाय्याने अध्ययन केले असता, त्यांना
समुद्रातील ऑक्सिजनचे प्रमाण घटत असल्याचे दिसून आले.

त्यामुळे समुद्रातील सूक्ष्म जीवांच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याची भितीही निर्माण झाल्याचे या वैज्ञानिकांना आढळून आले आहे. समुद्राच्या जीवन चक्रावर याचा विपरीत परिणाम होत असून,समुद्राचे वाळवंट होत असल्याचे या वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे.
About Writer
वार्ता