1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या

हरभजन आयपीएलमधून निलंबित

विवादास्पद फिरकी गोलंदाज हरभजनसिंगने मोहाली संघाचा गोलंदाज श्रीसंथच्या मुस्कटात मारल्याप्रकरणी त्याला इंडियन प्रिमीयर लीगमधून (आयपीएल) तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्यात आले.

सुरवातीला व्हिडीओ दृश्याच्या आधारे आणि सामनाधिकारी फारूख इंजीनीयर यांनी केलेल्या तपासात हरभजनसिंगला चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आल्याचे आयपीएल अध्यक्ष लीलीत मोदी यांनी आज सांगितले. या प्रकरणी सोमवारी (दि. 28 एप्रिलला) पुढील सुनावणी होणार आहे.

फारूख इंजीनियर यांनी सोनी आणि टीडब्ल्यूआय चॅनेलद्वारे उपलब्ध केलेल्या रेकॉर्डींग टेपची समीक्षा करून हा निर्णय घेतला आहे. मोहलीच्या किंग्ज इलेव्हन आणि मुंबई इंडियन्स यांच्या झालेल्या सामन्याची चौकशी दिल्ली येथे 28 एप्रिलला मौर्या शेरेटन हॉटेलमध्ये होणार आहे. सुनावणीनंतर अंतिम निर्णय फारूख इंजीनियर घेतील.