1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक

निवडणूक हिंसाचारात 17 ठार

निवडणूक हिंसाचारात 17 ठार
पंधराव्या लोकसभेसाठी घेण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला नक्षल प्रभावित राज्यांमध्ये हिंसक वळण लागल्याने विविध राज्यात आज 17 जणांना आपले प्राण गमवावे लागले.

झारखंड, बिहार, छत्तीसगड, आणि महाराष्ट्रातील गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी हल्ला केला. यात झारखंडमध्ये सात, बिहारमध्ये दोन, नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमध्ये केलेल्या स्फोटात एका झोनल अधिकार्‍यासमवेत पाच कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला.

झारखंडच्या लातेहार जिल्ह्यातील चंदवा भागातील केहेसला जंगलात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात सुरक्षादलाच्या सात जवानांसह नऊ जणांचा बळी गेला.
About Writer
वार्ता