1. वृत्त-जगत
  2. »
  3. निवडणूक
  4. »
  5. लोकसभा निवडणूक

मायावतींची वरुणला धमकी

सर्वोच्‍च न्यायालयाकडून जामीन मिळाल्‍यानंतर जामीनावर बाहेर आलेल्‍या भाजपचे पीलीभीत मतदार संघातील उमेदवार वरुण गांधी यांनी पुन्‍हा भडक भाषण दिले तर त्‍यांच्‍यावर पहिल्‍यापेक्षाही जास्‍त मोठी कारवाई करण्‍याचा इशारा उत्तर प्रदेशच्‍या मुख्‍यमंत्री आणि बसपा अध्‍यक्षा मायावती यांनी दिला आहे.

लखनऊमध्‍ये पत्रकार परिषदेत मायावती यांनी हा इशारा दिला. त्‍या म्हणाल्‍या, की जर वरुणने पुन्‍हा पीलीभीत सारख्‍या घटनेची पुनरावृत्ती केली तर त्‍यांना यावेळी अजिबात सोडणार नाही.