रोहित पवार यांचे तुकाराम मुंडे यांना निवेदन; पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी
रोहित पवार यांनी एमपीएससी अन्न व औषध निरीक्षक भरती परीक्षेतील पेपरफुटीसंदर्भात एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांना एक निवेदन सादर केले असून, परीक्षा रद्द करण्याची आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांच्या सचोटीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अन्न व औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीमुळे आता राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तरुण आमदार रोहित पवार यांनी या संवेदनशील विषयासंदर्भात आज अन्न व औषध निरीक्षक आयुक्त तुकाराम मुंडे यांची भेट घेतली आणि त्यांना एक सविस्तर निवेदन सादर केले.
एमपीएससीने २२ मार्च, २०२६ रोजी अन्न व औषध निरीक्षक पदांसाठी परीक्षा घेतली होती. परीक्षा झाल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या बातम्या पसरू लागल्या. आपल्या निवेदनात रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे की, परीक्षेच्या केवळ दोन दिवस आधी व्हॉट्सॲप स्टेटस आणि विविध डिजिटल माध्यमांवर कथित प्रश्नपत्रिका प्रसारित होत असल्याबाबत गंभीर आरोप समोर आले आहे.
रोहित पवार यांनी सादर केलेल्या पत्रात काही अत्यंत धक्कादायक दावे केले आहे. व्हॉट्सॲपवर प्रसारित होणारे संदेश आणि प्रत्यक्ष परीक्षेची प्रश्नपत्रिका यांच्यात साम्य आढळून आले आहे. १०० पैकी ९० प्रश्न सोशल मीडियावर आढळले असून, मोबाईल फोनद्वारे कॉपी केल्याचा दावा करणारे संदेश प्रसारित केले जात होते. सर्वात गंभीर आरोप असा आहे की, २० मार्च २०२६ रोजी, परीक्षेच्या केवळ दोन दिवस आधी, काही उमेदवारांच्या मोबाईल फोनवर प्रश्नपत्रिकेचे फोटो पाठवण्यात आले होते. या उमेदवारांनी परीक्षेत खूप जास्त गुण मिळवल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.औषध निरीक्षक पदाच्या परिक्षेचा पेपर फुटल्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे साहेब यांची स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसोबत भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि या पेपरफुटी प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व कालबद्ध मर्यादेत चौकशी करण्याची विनंती त्यांना केली,… pic.twitter.com/jLM7Texawc
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 27, 2026
Edited By- Dhanashri Naik

